मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने पहाटेच केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ईडीने सकाळी 6 वाजता नवाब मलिकांवर कारवाई केली आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ईडी व भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे.
भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे समनव्यक तुषार भोसले यांनी देखील नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. अब नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा, असं खोचक ट्विट तुषार भोसले यांनी केलं आहे.
दरम्यान, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे. नवाब मलिक यांच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार आणि या प्रकरणाला कोणतं वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अब नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा ❗️
और
मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा ‼️#सत्यमेवजयते #devendrakadhamaka
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) February 23, 2022
थोडक्यात बातम्या-
‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल
“भाजपने स्वतःचा ईडी चालवायला माणूस ठेवला असेल”
“प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, आता हौतात्म्य आलं तरी चालेल”
नवाब मलिकांवरील कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
दूध ना साखर, ब्लॅक कॉफीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Comments are closed.