बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा घ्या पुरावा, हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण”

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. काँग्रेस व्यतिरिक्त देशात तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं मत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आज ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याआधी ममतांंनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यावरून आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. (Tushar Bhosale has criticized Shiv Sena)

‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण आहे, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांन केली आहे. हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना असल्याची टीका देखील तुषार भोसले यांनी केली आहे. ट्विट करून तुषार भोसले यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी च्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो देखील शेअर केला आहे.

मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना लवकर आराम पडो मात्र दोन वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या शस्त्रक्रियेची गरज असल्याची जहरी टीका तुषार भोसले यांनी केली होती.

दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून आता भाजपने काँग्रेसला डिवचण्यास सुरूवात केली आहे. आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता तुषार भोसले यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पहावं लागणार आहे.

पाहा ट्विट-


थो़डक्यात बातम्या-

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

“एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष…”, नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More