बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

नाशिक | उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचं पातक फेडावं लागेल. अनिल देशमुख यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता येत्या 40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, असं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे.

अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरु झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला.

शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे.  येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आम्ही 2024मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! ‘या’ काँग्रेस आमदाराचं कोरोनामुळे निधन

डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ, अटीतटीच्या सामन्यात RCBचा विजय

‘त्या’ चेंडूनं केला विराट कोहलीचा घात, उजवा डोळाच केला लाल!

बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूनं मोडली मुंबईची कंबर, निम्मी टीम पाठवली माघारी!

…म्हणून मुंबई इंडियन्सचे समर्थक म्हणतात, पहिली मॅच आम्हाला हरायचीय!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More