बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे विश्वासघाताने मुख्यमंत्री झाले”

मुंबई | बईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. तसेच भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मात्र शरद पवारांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता या प्रकरणावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेत.

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी अनिल देशमुखांकडे दिलं, असं संजय राऊत म्हणाले. यावरून भाजपचे महाराष्ट्र आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

अनिल देशमुख हे ‘अपघाताने’ गृहमंत्री, अगदी बरोबर, पण पूर्ण सत्य लिहा ना… अनिल देशमुख हे ‘अपघाताने’ गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे ‘विश्वासघाताने’ मुख्यमंत्री ! बुरा ना मानो होली है, असा टोला तुषार भोसलेंनी लगावला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘सामना’तून सरकारवरच टीकेचे बाण; वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे

‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण?

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More