बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या वर्षीही आषाढी वारीवर निर्बंध लाधले आहेत. राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत यामध्ये यंदा फक्त मानाच्या पालख्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश मिळणार आहे. यावरून भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली. मात्र सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना पुढील परिणामांना सामोर जाण्याची तयारी ठेवावी, असं म्हणत तुषार भोसलेंनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

पायी वारी ही कोणत्याही परिस्थितीत होणारच, सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर शेवटचा मुक्कामाचं गाव असलेल्या वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

खुशखबर! आता इंजिनीअरिंग मराठीतही करता येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

‘मला हे भयानक वाटलं’; सेक्स करताना गर्लफ्रेंड करायची ही विचित्र मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More