देश

….म्हणून महात्मा गांधींच्या पणतूला रडू कोसळलं; म्हणाले बापूंना आता रिटायर करा!

औरंगाबाद |  बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, याच दिवशी मध्य प्रदेशातील रेवा येथे महात्मा गांधींच्या अस्थींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरच बोलताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना रडू कोसळलं.

औरंगाबादमध्ये ‘गांधी-माणूस ते महात्मा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. यावेळी ‘कस्तुरबा मला उमजलेल्या’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं.

संतापजनक म्हणजे अज्ञातांनी गांधींजींच्या फोटोवर देशद्रोही असं लिहिलं होतं. या घटनेने गांधी अनुयायांच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त करणाऱ्या राजकारण्यांनी यावर मात्र अवाक्षर देखील काढलं नाही. यानेच तुषार गांधींना अश्रू अनावर झाले.

नव्या भारताला जर नवे राष्ट्रपिता मिळाले आहेत तर बापूंना आता रिटायर करा, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. नव्या भारताला आता बापूंची गरज राहिली नसल्याची उद्वीग्न प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या