मुंबई | कोकणात धावणाऱ्या दादर-सावंतवाडी रेल्वेचं नामकरण करण्यात आलं आहे. तुतारी एक्स्प्रेस असं या रेल्वेचं नाव असणार आहे. कवी केशवसुतांच्या तुतारी कवितेवरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे.
दादर-सावंतवाडी मार्गावर १ जुलै २०११ रोजी राज्यरानी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. कोकणवासियांचा प्रवास या गाडीमुळे खऱ्या अर्थाने सुखकर झाला. केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म कोकणातील गणपतीपुळ्याचा असल्याने त्यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.
Comments are closed.