टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

Aman Jaiswal Death | टीव्ही अभिनेता अमन जैस्वालचा (Aman Jaiswal Death) शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) भागात झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला. अवघ्या २३ वर्षीय अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूमुळे मनोरंजन क्षेत्रातून (Entertainment Industry) हळहळ व्यक्त होत आहे.

ऑडिशनला जाताना काळाचा घाला

‘धरतीपुत्र नंदिनी’ (DhartiPutra Nandini) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अमन जैस्वाल मोटारसायकलवरून (Motorcycle) ऑडिशनसाठी (Audition) जात होता. त्यावेळी एका ट्रकने (Truck) त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन अमनला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात (Balasaheb Thackeray Trauma Hospital) दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अमन जैस्वालची कारकीर्द

अमन जैस्वाल हा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Baliya) येथील रहिवासी होता. त्याने करिअरची सुरुवात (Career Starting) मॉडेलिंगपासून (Modelling) केली होती. त्यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये (TV Industry) प्रवेश केला. विविध मालिकांमध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची (Supporting Actor) भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे त्याने खास प्रेक्षकवर्ग (Audience) निर्माण केला होता. (Aman Jaiswal Death )

तपास सुरू; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अभिनेता अमनच्या अकाली निधनामुळे (Untimely Death) त्याच्या चाहत्यांना (Fans) मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातातील ट्रक जप्त (Seize) केला आहे. चालकाविरुद्ध (Driver) बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी (Rash Driving) गुन्हा दाखल (FIR) करून तपास सुरू केला आहे. (Aman Jaiswal Death )

Title : TV Actor Aman Jaiswal Death in road accident 

महत्वाच्या बातम्या- 

‘त्या 700 फायली गायब’; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर

शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का; भाजपची नवी खेळी

सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर!

पुण्याच्या घटस्फोटाच्या निकालाची देशभर चर्चा, कोर्टानं पतीला दिले कठोर आदेश

सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील पदार्थाचा समावेश, तुम्हीही खात असाल तर सावधान