बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खतरो के खिलाडी 11’ च्या विजेत्याचं नाव फुटलं?, ‘हा’ अभिनेता ठरला विजेता!

मुंबई | कलर्स हिंदी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘खतरो के खिलाडी 11’ हा शो खुप लोकप्रिय आहे. या शोमध्ये बॉलिवुड कलाकारांसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. ‘खतरो के खिलाडी 11’ शोची अंतिम फेरी 25 ते 26 सप्टेंबर रोजी कलर्स हिंदी वाहिनीवर रात्री 09:30 वाजता प्रसारित होणार आहे. मात्र हा शो प्रसारित करण्याअगोदरच यंदाच्या शोचा विजेता घोषित करण्यात आला आहे.

बॉलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा स्टंटवर आधारित ‘खतरो के खिलाडी’ रियालिटी शोचा चाहता वर्ग मोठा आहे.  अर्जून बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी,  राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंह आणि श्वेता तिवारी हे पाच स्पर्धक खतरो के खिलाडी 11 च्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आहे. अंतिम सोहळ्य आधी अर्जूनची पत्नी नेहा स्वामी हिने या शो चा विजेता म्हणून टीव्ही अभिनेता अर्जून बिजलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबत नेहा स्वामीने विजयानंतर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मला माहिती आहे की तु यासाठी काय केलं आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. तुला जगातील सर्व सुख मिळो, असं अर्जूनची पत्नी नेहा स्वामीने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. खतरो के खिलाडी 11 च्या ट्रॉफीसह नेहा अर्जूनसोबत सोशल मीडियावरील फोटोमध्ये दिसत आहे. नेहाने या विजयानंतर पार्टीचे आयोजन केलं होतं. तेव्हा पार्टीचे फोटो आणि काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत.

दरम्यान, ‘खतरो के खिलाडीं’ या शोचे 11 भाग आतापर्यंत प्रसारित झाले आहेत. कलर्स हिंदी वाहिनीवर अनेक शो प्रसारित होत असतात. परंतु रोहित शेट्टीचा हा शो लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Swami (@nehaswamibijlani)

थोडक्यात बातम्या-

रस्त्यावर उभं राहत मुंबईतील पठ्ठ्यानं केलं असं काही की…, व्हिडीओ तुफान व्हायरल

उद्यापासून राज्यात सलग 3 दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

‘हिंदू धर्माला धोका असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत’; गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

सोयाबीनच्या भावात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचा भाव

येत्या 24 तासांमध्ये मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी- किरीट सोमय्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More