बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉलिवूडला धक्का, अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबई | टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 44 वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही.

समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांदा घरातील 7 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता खा. नवनीत राणा यांनाही कोरोनाची लागण

मंदिरे बंद ठेऊन राज्य सरकारनं आडमुठेपणा केला आहे- गिरीश महाजन

“विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक, शिवभक्तांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार”

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More