वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेत देशात कोणत्या पक्षाला मिळालंय बहुमत?? बघा कोणत्या पक्षाला किती जागा…

मुंबई |  7 टप्प्यांमध्ये झालेला लोकशाहीचा हा उत्सव संपला असून आता फक्त 23 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. पण त्या अगोदर या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.

TV9-सी व्होटर सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा बहुमत मिळेल, असा मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

भाजपला 287+जागा मिळू शकतात तर काँग्रेस शंभरी देखील पार करू शकणार नाही, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला 34 जागा मिळू शकतात तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळू शकतात, अशी शक्यता या सर्व्हेने व्यक्त केली आहे.

TV9-सी व्होटर सर्व्हेच्य़ा अंदाजानुसार पुन्हा एकदा देशात मोदींचाच डंका वाजणार, असं एकूण या सर्व्हेतून समोर येतंय.

महत्वाच्या बातम्या

-महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

-अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

-हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

-नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री