जबरदस्त आणि आकर्षक टीव्हीएस कंपनीची ब्लॅक एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TVS मोटर कंपनीने एका नव्या लूकमध्ये जबरदस्त फीचर्ससह बाईक बाजारात लाँच केली आहे. कंपनीने आपल्या 160 सीरिजच्या बाइकला हा नवा लूक दिला आहे. TVS कंपनीने Apache RTR 160 आणि Apache RTR 160 4V हे अपडेट व्हेरियंट लाँच केले आहे. कंपनीने या दोन्ही बाईकचे ब्लॅक एडिशन भारतीय बाजारात लाँच केले आहे. या ब्लॅक एडिशन बाईक लाँच करण्यासोबतच कंपनीने या मोटारसायकलींची किंमतही जाहीर केली आहे.

TVS Bike l दोन व्हेरियंटमध्ये बाईक लाँच :

TVS कंपनीचे म्हणणे आहे की, Apache 160 सिरीजच्या दोन्ही बाइक्सच्या बाहेरील नवीन काळा रंग निर्भय भावनेचे प्रतिबिंबित करतो. तसेच ब्लॅक एक्सटीरियरसोबतच या बाइक मॉडेल्सच्या ग्राफिक्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच याच्या टाकीवर TVS चा लोगो देखील लावण्यात आला आहे.

या Apache बाइक्सच्या ब्लॅक एडिशनच्या घोषणेसोबत, टीव्हीएस मोटर कंपनीच्या बिझनेस-प्रीमियमचे प्रमुख विमल सुंबली म्हणाले की, अपाचे ही चार दशकांपासून रेसिंगच्या वारशाच्या मुळाशी जोडलेली बाइक आहे. TVS Apache ने 5.5 दशलक्ष लोकांच्या जागतिक समुदायापर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात वेगवान प्रिमियम मोटरसायकल ब्रँड बनले आहे. वि

TVS Bike l किंमत किती असणार? :

TVS Apache RTR 160 4V ब्लॅक एडिशन हा बेस व्हेरिएंट आहे. या बाईकच्या ब्लॅक एडिशनमधून रियर डिस्क आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची वैशिष्ट्ये काढून टाकण्यात आली आहेत. पण याशिवाय ही बाईक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या Apache 160 सीरीज मोटरसायकलमध्ये थ्री-राइडिंग मोडचे वैशिष्ट्य आहे. तसेच, या बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेल लाईट, ग्लिच थ्रो टेक्नॉलॉजी (GTT) आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Apache 160 सीरीज बाईकच्या ब्लॅक एडिशनचा लुक जबरदस्त आहे. TVS Apache RTR 160 Black Edition ची एक्स-शोरूम किंमत 1.20 लाख रुपये आहे. तर TVS Apache RTR 160 4V ची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे.

News Title – TVS Apache Black Edition Motorcycle

महत्त्वाच्या बातम्या

“मला काहीही फरक पडत नाही”, पांड्याचं वक्तव्य चर्चेत

आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर ‘हा’ संघ प्लेऑफच दार उघडणार

‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट जारी

मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…