गँगचा लीडर कोण?, CID च्या तपासात खळबळजनक खुलासा

Beed

Beed l मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येच्या तपासाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ९ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर, संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. या वादातूनच सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केल्याचे समोर आले होते.

वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा सुरुवातीचा संशय :

या हत्येमध्ये सुदर्शन घुलेचा थेट सहभाग असला तरी, वाल्मिक कराड हाच खरा मास्टरमाईंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून केला जात होता. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. अखेरीस, वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Beed l सीआयडीच्या तपासात नवीन खुलासा :

मात्र, सीआयडीच्या तपासात एक वेगळाच खुलासा समोर आला आहे. सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर, तर वाल्मिक कराडला या गँगचा सदस्य असल्याचे नमूद केले आहे.

या धक्कादायक खुलास्यानंतर वाल्मिक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाईंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सीआयडीमध्ये तपासी अधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल

दुसरीकडे, सीआयडीने सुदर्शन घुलेला गँग लीडर आणि वाल्मिक कराडला गँगचा सदस्य म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. तपासी अधिकारी बदलण्यात आले आहेत. अनिल गुजर यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. अचानक करण्यात आलेल्या या बदलांमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

News Title: Twist in Santosh Deshmukh Murder Case: Sudarshan Ghule the Real Mastermind?

महत्वाच्या बातम्या-

सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती!

गुगलवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

सैफला चाकूने का मारलं?, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?, गुपित उघड, गंभीरच्या आरोपाने खळबळ

‘नाशिकमधील आश्रमात…’; सरपंच हत्या प्रकरणी तृप्ती देसाईंचा खळबळजनक आरोप

 

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .