पुणे | कसबा मतदारसंघात आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे . त्यातच चिंचवडमधून पोटनिवडणुकीबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
चिंचवडमध्ये राहुल कलाटे(Rahul Kalate) यांचं बंड रोखण्यास आणि राहुल कलाटेंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास महाविकास आघाडी अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आता याचा मोठा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच नाना काटे(Nana Kate) यांना बसू शकतो.
शुक्रवारी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सचिन आहिर(Sachin Ahir) हे उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) निरोप घेऊन राहुल कलाटे यांना भेटले होते. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा हा निरोप होता. परंतु राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
पण हेच सचिन आहिर आता असं काही बोलले आहेत ज्यामुळं ते ठाकरेंवर नाराज आहेत, असं दिसत आहे. आहिर म्हणाले आहेत की, मी संपर्कप्रमुख असून माझ्या पक्षाला माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही म्हणून मी नाराज आहे.
जर भाजपच्या जागी आम्हाला उमेदवारी नाही मिळत तर मग आम्ही उमेदवारी मागायची तरी कुठं?, असा सवालही सचिन आहिर यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या पक्षात फूट पाडून आमच्या पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा प्रकार केलेल्या भाजपला हरवण्यासाठी आम्ही दोन पावलं मागे घेऊ. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असंही सचिन आहिरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-