बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ट्विटरने हटवला भारताचा चुकीचा नकाशा; जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश दाखवल्याने पेटला वाद!

नवी दिल्ली | मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन भारतातील राज्य वेगळे देश दाखवण्यात आल्याने मोठा वाद पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर या ना त्या कारणावरून चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.

ट्विटरने ही चूक जाणीवपूर्वक केली की, नकळत झाली याबाबत तपासानंतरच सर्व गोष्टी निष्पन्न होतील, पण देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी यापूर्वीच ट्विटरला इशारा देण्यात आला असतानाही ट्विटरने पुन्हा तीच चूक केल्याने ट्विटरवर केंद्र सरकार कठोर कारवाई करू शकतं.

दरम्यान, यापूर्वी ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लेह चीनचा भाग असल्याचं नकाशात दाखवलं होतं. त्यावरूनही चांगलंच वादंग पेटलं होतं. दरम्यान, आता भारतातुन तिव्र विरोध झाल्यानंतर ट्विटरने मोठ्या विरोधानंतर हा वादग्रस्त नकाशा आपल्या साइटवरून काढून टाकला आहे. या प्रकरणामुळे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे.

ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा वाद गेल्या काही दिवसांपासून होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भारताचे केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट ट्विटरने अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ब्लॉक केलं होतं. तसेच ट्विटर भारतातील आयटी कायद्यांचं सर्रास उल्लंघन करत असल्याचं समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता ट्विटरवर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘फडणवीस RSSच्या शिकवणीप्रमाणे आरक्षण संपवायला निघालेत’; काँग्रेसचा हल्लाबोल

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

प्रदीप शर्माची तळोजा कारागृहात रवानगी, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

“तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More