बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

मुंबई | मागील काही दिवसांपासून ट्विटर कंपनीत (Twitter) मोठ्या बदलाची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच आता ट्विटरचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्याजागी आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. (India’s Parag Agarwal new CEO)

ट्विटरने देखील याबाबत माहिती दिली आहे. सीटीओपदी असणारे पराग अग्रवाल त्यांची जागा घेतील आणि डॉर्सी त्यांच्या संचालक मंडळावर कायम राहतील. ब्रेट टेलर बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे.

परागने आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. तसे, पराग चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पदावर सहा महिने कार्यरत होते.

दरम्यान,  परागने आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च, याहू रिसर्च आणि एटी अँड टी लॅबमध्येही काम केले आहे. ट्विटरमध्ये परागने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून युजर्सचे ट्विट वाढवले होते.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

राज्यातील निर्बंध वाढवणार का?, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More