आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाख रुपयांचं अनुदान!

मुंबई | आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. 

आंतरजातीय तसेच आंतरधर्मिय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आलीय. 

येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार या कायद्याचे विधेयक मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळतं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या