रायगड | प्रजासत्ताक दिनादिवशी सकाळी ध्वजाला वंदन करून बाहेर फिरायला जायचं नियोजन असतं. अनेकजण या दिवशी काहीना काही विशेष करत असताात. असाच एक अनोखा पराक्रम अलिबागमधील अडीच वर्षाच्या चिमुरडीने केला आहे. प्रबळगडाचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका सर केला आहे. चिमुरडीने आपल्या आई-बाबांसह अर्ध्या तासात हा सुळका सर केला.
शर्विका म्हात्रे असं या चिमुरडीचं नाव आहे. शर्विकाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. यापूर्वी शर्विकाने अकरा किल्ले सर केले असल्याची माहिती आहे. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनीही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली.
शार्विकाने या सुळक्यावर आरोहणकरून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावीत समाजातील तरूण वर्गाला एक उत्तम असा संदेश दिला.
दरम्यान, कलावंतीण सुळका हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायर्या आणि आभाला भिडणारा सुळका असा हा सुळका चढाई करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते.
ट्रेंडिंग बातम्या-
महाबळेश्वरसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय
आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या-
राहुल गांधींच्या ‘त्या’ टीकेवरुन स्मृती इराणींनी केला ‘हा’ थेट सवाल
भीमा-कोरेगाव प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा खुलासा
“राज्य सरकार बदललं की, आधीच्या सरकारच्या चौकशीचं राजकारण सुरु होतं”
Comments are closed.