Pune News l शहरातील मोठी हॉटेल्स, पब्ज आणि रिसॉर्ट्समधील पार्ट्यांमध्ये ग्राहकांना उच्च प्रतीचे विदेशी मद्य बेकायदा पुरवणाऱ्या (Illegal Liquor) दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. राजकुमार नारायण उपाध्याय आणि दीपेशकुमार विजयकुमार साहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Foreign Liquor)
उत्पादन शुल्क चुकवून विक्री :
आरोपींनी विदेशी मद्याच्या बाटल्यांसाठी राज्य सरकारला देय असलेले उत्पादन शुल्क न भरताच या मद्याची विक्री होत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Illegal Liquor)
Pune News l भरारी पथकाची कारवाई
भरारी पथकाचे प्रमुख (क्रमांक एक) देवदत्त पोटे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वानवडी हद्दीतील लुल्लानगर चौक ते नेताजीनगर कॉलनी रस्त्यावर सापळा रचण्यात आला. त्यावेळी एक व्यक्ती राज्यात विक्रीस व स्वतःकडे बाळगण्यास बंदी असलेले उच्च प्रतीचे विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने घेऊन जाताना आढळला. त्याच्या झडतीत विविध ब्रँडच्या ११ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
अवैध मद्य पुरवठ्याचा प्रकार उघड :
शहरात आणि आसपासच्या परिसरातील मोठी हॉटेल्स, पब्ज आणि रिसॉर्ट्समध्ये होणाऱ्या पार्ट्या किंवा इव्हेंट्समध्ये ग्राहकांसाठी उच्च प्रतीचे बेकायदा मद्य नियमित पुरवले जात (Illegal Liquor) असल्याची माहिती या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल.