Eknath Shinde | महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे. पण अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. कारण महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय.
भाजपने 132 जागा जिंकल्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंना भाजपकडून ऑफर
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवली गेली आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं, अशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.
मुख्यमंत्रिपदावर दाबा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती आहे. राज्याचं उमुख्यमंत्रिपदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं कळतंय.
Eknath Shinde यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे. जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील होण्याची संधी आहे. पण शिंदेंनी जर ही ऑफर स्वीकारली तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे. मात्र या ऑफरवर एकनाथ शिंदे हे नाराज आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांनो ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारं!
मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!
आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…
‘शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं’, दिल्लीतील नेत्याने सगळं सांगूनच टाकलं
फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी