बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

मुंबई | राज्यातील गेल्या काही महिन्यांमध्ये ईडीच्या (ED) कारवाईनं सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप (BJP) महाविकास आघाडीला (MVA Allaince) त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपवर होत आहे. अशातच वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कारवाईवरून राज्यात राजकीय कलगीतूरा रंगला आहे. इतक्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader Nawab malik) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

वक्फ बोर्डावर काय कारवाई करण्यात आली. या कारावाईमध्ये कोणाला आरोपी मानण्यात आलं हे सगळं ईडीनं स्पष्ट करावं असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात वक्फची जमीन हडप केलेल्या दोन भाजपच्या नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईल, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर वक्फ बोर्डात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यालाही उत्तर देताना मलिक यांनी सोमय्या यांना ईडीनं प्रवक्ता घोषित करावं अशी मागणी केली आहे. काही भाजप खासदारांनी सत्तेत असताना बोगस बिलाद्वारे पैसे उकळले आहेत आपण त्याचाही खुलासा करणार आहोत, असं नवाब मलिक म्हणले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात ईडीनं वक्फ बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावलं होतं. तसेच बोर्डाच्या काही मालमत्तांवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून हा वाद रंगला आहे.

थोडक्यात बातम्या 

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर…- संजय राऊत

वाद तिरंगा रॅलीचा; सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More