बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात! एका नवरीशी लग्नासाठी आले दोन नवरदेव, त्यानंतर घडलं असं काही की…

नवी दिल्ली |  एका नवरीसाठी दोन जणांनी आपली वरता नवरीच्या दारात नेली.  तुम्हाला वाटेल असं शक्य आहे का असं पण हे घडलं आहे. उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यामध्ये तिर्वा पोलीस ठाणे हद्दीत ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एकाच नवरीसाठी आलेल्या दोन वरातीमुळे गावकरीही हैराण झाले.

नवरी तर एक मग दोन वराती कशा आल्या तर एक वरात ही ज्या तरूणासोबत तरूणीचा विवाह होणार होता आणि दुसरी म्हणजे जिच्यासोबत तरूणीचं अफेर होतं. ज्या नवरदेवासोबत लग्न ठरलं होतं त्याची वरात आली नवरीकडच्यांनी जोरदार स्वागतही केलं अन् तितक्यात नवरीच्या प्रियकराचीही वरात तिथे आली. हे कळताच वरातींनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊ लागली.

विशेष म्हणजे प्रियकराचेही लग्न ठरलेलं होतं, त्याचं लग्न ठरलेल्या मुलीकडच्यांना ही खबर लागली. मग तेही पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आणि या लग्नाला विरोध करू लागले. चार वधू-वराचे पक्ष आणि पोलीस अशी चर्चा होऊ लागली. शेवटी गावची पंचायत बोलवण्यात आली. बराच वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर पंचायतमध्ये नवरीने तिच्या प्रियकराची निवड केली. मात्र आता अरेंज मॅरेज ठरलेल्या नवरदेवाचे काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला. तिथेही शेवटी तोडगा काढलाच. नवरदेवाचा पडलेला चेहरा पाहून गावातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिलं.

दरम्यान, या बैठकीत नवरीच्या कुटुंबियांनी खऱ्या नवरदेवाने दिलेले दागिने आणि इतर साहित्य परत केले. नवरदेवाने देखील त्यांच्याकडून घेतलेली बाईक मागे दिली.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं”

पोलिसासोबत संबंध ठेवण्यासाठी सराफाची पत्नी करायची असं काही; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

घरजावई असलेल्या पती आणि पत्नीचे रात्री झालं भांडण, सकाळ होताच समोर आला धक्कादायक प्रकार

“अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More