बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; अचानक वायर तुटली अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रस्त्याने चालत असलेल्या या दोन भावांवर विजेची तार पडल्याने एकाच वेळी दोन सख्ख्या भवांचा जीव गेला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलीगड शहराच्या परिसरात दोन सख्खे भाऊ चालत जात होते. यावेळी सिमेंटने भरलेला ट्रक विजेच्या खांबाला धडकला आणि जोरात आवाज आला. आवाज आल्यानंतर विजेची तार खाली कोसळली. दोघेही भाऊ पुढे पळतच होते की त्यातच तुटलेली तार त्यांच्या आंगावर पडली.

आंगावर पडलेल्या तारीमुळे दोघा भावांना आग लागली. यातच दोन सख्या भावांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या लोकांनी पोलिसांना तसेच दोघांच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरु केला.

दरम्यान, तपासात पोलिसांनी परिसरात सीसीटिव्ही कॅमेरा आहे का हे तपासलं. या फुटेजमध्ये दोघा भावांच्या मृत्यूचा थरारक व्हिडीओ कैद झाला आहे. तसेच या घटनेनं संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस हा प्रकार नक्की कोणामुळं घडला हे शोधत असून विजेच्या तारांचं नियोजन सुरक्षित कसं करता येईल हे पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज!

“मी सांगितलं, राजीनामा देतोय, सोनिया म्हणाल्या, I AM SORRY अमरिंदर”

अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More