Top News बुलडाणा महाराष्ट्र

“ए शंकरपाळ्या…” महाराष्ट्राला वेड लावणारं लहान मुलांचं भांडण व्हायरल

मुंबई | सोशल माध्यामांवर एका रात्रीत आपण काहींना स्टार होताना पाहिलं आहे. मात्र आता सध्या चर्चा आहे ती महाराष्ट्रातील कळंबेश्वर ता. मेहकर जिल्हा बुलडाणा येथील दोन चिमुकल्यांच्या भांडणाची. दोघेही अगदी निरागस पण भांडणं मात्र अगदी सिरीअस. या दोघांनी महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

दोन मुले गल्लीत भांडत असतात. खेळत असताना भांडण होतं तर त्यातील एक मुलगा दुसऱ्याला शंकरपाळ्या म्हणून चिडवत असतो. दुसरा मुलगा रागाने त्याच्या अंगावर धावून जातो.

धावून गेलेल्या मुलगा शेवट त्याला एक डायलॉग टाकतो तो म्हणजे, एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई, त्याची ती बोलीभाषा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.

दरम्यान, या मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे. शंकरपाळ्या नावाचा हॅशटॅग सध्या वापरला जात आहे. त्या मुलाच्या डायलॉगवर मीम्स बनवू लागले आहेत.

थोडक्यात बातम्या-

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या