बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

पाटना | बिहारची राजधानी पाटणामध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. पाटण्यातील पुनपुन परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनिला देवी बुधवारी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेल्या होत्या. पाच मिनिटांच्या अंतरानं त्यांना कोरोनाच्या दोन लसी देण्यात आल्या आहेत. या महिलेनं ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळं घडल्याचा आरोप केला आहे.

सुनिला यांच्या कुटूंबानं सांगितलं की,’ लसीकरणासाठी जेव्हा सुनिला लसीकरण केंद्रावर गेली तेव्हा त्यांना अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही डोस वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे होते. सुनिला यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.

आरोग्य कर्मचाऱ्यांची ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी महिलेला 24 तास लक्ष ठेवण्यात येईल, असं सांगितलं. मात्र, देखरेखीसाठी लसीकरण केंद्रातून कोणीही आलं नाही. रात्री महिलेला अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला ग्लुकोज दिलं. कुटुंबियांना काही बरंवाईट होईल, याची भिती वाटत होती. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या सर्व बेजबाबदारपणामुळं ग्रामस्थही घाबरले आहे.

दरम्यान, रात्रभर महिलेला ताप आला. मात्र तिच्या तपासणीसाठी डॉक्टर, नर्स यापैकी कोणीही आलं नाही. या घटनेमुळे लसीकरण केंद्राचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

“महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड”

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More