एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पवना धरणात घडली दुःखद घटना

Pawana Dam Crime l पुण्यातील पावन धरण क्षेत्रात अंगावर थरकाप आणणारी घटना घडली आहे. पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे. यावेळी बोट उलटल्याने पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेला मित्र देखील बुडाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.

नेमकं काय घडलं? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्याजवळील पवना धरणात बोट उलटल्याने एक मित्र पाण्यात पडला. मात्र त्यावेळी त्या मित्राला पाण्यात पडलेलं पाहून दुसरा मित्र मदतीला धावून गेला. मात्र या घटनेत दोन्हीजन वाचवण्यासाठी गेलेला मित्रही बुडाला आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन देखील सरकली आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pawana Dam Crime l घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :

मात्र यावेळी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बोट उलटल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम देखील कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील मयूर रवींद्र भारसाके आणि तुषार रवींद्र अहिरे अशी मृत तरुणांची नावं आहेत.

याशिवाय या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग बचाव पथक आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन दिवस शोध मोहीम देखील राबवली होती. मात्र यावेळी त्यांना मृतांचे मृतदेह मिळाले आहेत.

News Title –  two drown in pawana dam after boat capsizes 

महत्त्वाच्या बातम्या :

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ‘एवढ्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या!

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? अशाप्रकारे काळजी घ्या

वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!

फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर