लखनऊ | आजकाल प्रेमाला घरच्यांचा विरोध असेल तर मुल-मुली घरातून पळून जाऊन लग्न करतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये दोन तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी चक्क घर सोडून पळाल्या आहेत. दोघी लग्नासाठी पळून गेल्याने परिसरात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
या दोन तरुणी एकाच महाविद्यालयात शिकत होत्या. त्यावेळी त्या एकमेकींच्या प्रेमात पडल्या . त्यातील एका तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोन तरुणींना पंजाबच्या जालंधरमधून अटक केलं आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन त्या दोघींमधील वयस्कर मुलीवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दोघींची चौकशी केली त्यावेळी त्या लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही मुलींच्या घरच्यांनी दोघींना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या लग्न करण्याच्या निर्णयावर अडून होत्या.
दरम्यान, त्या दोघींमधील वयस्कर मुलीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर तिला तुरुंगात पाठवण्यात आलं असल्याचं समजत आहे.
थोडक्यात बातम्या –
पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!
सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ जंगी मिरवणुकीवर अजित पवार म्हणाले….
कॉलेजला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला कालव्यात, घरातलाच आरोपी निघाल्याने खळबळ!
‘…पण इतिहास चुकीचा होता’; शिवजयंतीनिमित्त वीरूचं खास ट्विट