बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच तरुणीवर दोन गुंडांचं जडलं प्रेम, तरुणीने नकार दिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये एक ब्रिटीश विद्यार्थीनी माहिरा जुल्फिकारची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन गुंड तिच्या प्रेमात पडले होते आणि त्यांना तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करायचं होतं. मात्र नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली.

माहिरा ही 26 वर्षांची असून ती लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेत आहे. काही दिवसांपुर्वी माहिरा आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी पाकिस्तानला आली होती. यादरम्यान तिथं स्थानिक असलेल्या दोन गुंडांचं तिच्यावर प्रेम जडलं. ते दोघेही तिला जबरदस्ती लग्न करण्यास त्रास देत होते. मात्र तिने दोघांनाही लग्नास नकार दिला.

लंडनला गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावं लागेल ज्यामध्ये आपले जास्त पैसे जातील, असा विचार करुन माहिरा मैत्रिणीच्या लग्नानंतर काही दिवस पाकिस्तानमध्येच राहत होती. मात्र लग्नाला नकार दिल्याच्या रागातून सोमवारी सकाळी 4 हल्लेखोर कथितपणे माहिराच्या बेडरूममध्ये शिरले आणि तिची गोळ्या झाडून हत्या केली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींना साथ देत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित आरोपी तरुणीला त्रास देत असताना तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या-

“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”

“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”    

भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

उर्वरित आयपीएल ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता; ब्रिजेश पटेल यांचं सुचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More