बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

श्रीगोंदा | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता श्रीगोंद्यातील दोघा आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

श्रीगोंद्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शासकीय कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या दोघा आजोबांनी रेमडेसिविरविना ऑक्सिजनच्या साहायाने काेरोनावर मात केली आहे. दत्तात्रय बनकर, विठ्ठल चोरमले, अशी या दोघा आजोबांची नावं आहेत.

68 वर्षीय दत्तात्रय बनकर आणि 80 वर्षीय विठ्ठल चोरमले यांचा एचआरसीटी स्कोअर 23 होता. ऑक्सिजन आणि गोळ्या, औषधांवर या दोघा आजोबांनी आठव्या दिवशी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

ATM सेंटरमधलं CCTV फुटेज व्हायरल, ‘या’ माणसाचा कारनामा पाहून सारेच हैराण

माज यालाच म्हणतात का?, कृणाल पांड्याच्या कृतीवर सोशल मीडियात एकच चर्चा

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More