बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, गाड्यांची तोडफोड; पाहा व्हिडीओ

अहमदनगर | काही काळापुर्वी पुण्यात गुंडांनी हौदोस घातला होता. पुण्यात गुंडगिरी, टोळीयुद्ध भरपूर वाढली होती. पुणे पोलिसांनी वेळीच पाऊल उचलत पुण्यातल्या गुंडागिरीला आळा घातला. पण अद्यापही राज्याच्या काही भागात गुंडगिरी, हाणामाऱ्या, टोळीयुुद्ध पाहायला मिळतं आहे. यातच आता अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे.

दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये तब्बल सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.या हाणामारीत झालेल्या जखमींवर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय तसेच अहमदनगरमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे पाथर्डी शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे. तर स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दोन्ही गटांतली लोकांनी दुचाकींची देखील तोडफोड केली आहे. टोळीतील लोकांनी गाड्यांची केलेली तोडफोड व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर दगड आणि विटा पडलेल्या देखील दिसत आहेत. गाड्यांची तोडफोड केल्यामुळं या हाणामारीत लोखोंचं नुकसान झालं आहे. मात्र, दोन गटांत झालेल्या भांडणाचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान, हे प्रकरण आता पोलिसांमध्ये पोहोचलं आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गोंधळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असले तरी देखील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे

‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More