बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकीकडे पाकिस्तान मैदानावर इतिहास रचत होता, तर दुसरीकडे पाकिस्तानात 10 जणांचा मृत्यु झाला

नवी दिल्ली | पाकिस्तानने T-20 विश्वचषकातील भारताविरोधातील सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र त्यातच पाकिस्तानच्या आदिवासी भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये अंदाजे 10 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

आदिवासी भागातील जंगलाच्या जमिनीवरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत 10 लोकांचा मृत्यू झालाय तर 15 च्या आसपास लोक जखमी झाले असल्याचंही समोर आलं आहे. पेशावरपासून 251 किलोमीटर दुर असणाऱ्या खुर्रम जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

मागील काही दिवसांपासून या गावातील दोन जमातीमध्ये जंगलातील जागेवरून वाद सुरू होते. गायडू आणि पेवार या जमातींमध्ये हा वाद सुरु झाला होता. हा वाद शनिवारी इतका वाढला की शेवटी दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या घटनेसंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, या लोकांकडे अनेक धोकादायक शस्त्रे होती. बंदूकीपासून अगदी रॉकेट लाँचरचाही या शस्त्रांमध्ये समावेश होता. आत्तापर्यंत 10 लोकांनी आपला जीव गमावला असून अजूनही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून पाकिस्तानमध्ये सध्या गंभीर परिस्थिती आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ पाच गोष्टी ठरल्या भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

“प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, माझ्यावर कारवाई केली जाऊ नये”

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More