बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट; राजकीय दबाव वाढला!

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानभवनात सचिन वाझे यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. तसेच हे प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सचिन वाझे यांची मदत कोण करत आहे? आणि त्यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्नही विरोधी पक्षाने उपस्थित केला आहे. सचिन वाझे यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन गट पडले असल्याची माहिती नुकतीच एका वृत्तवाहिनीने दिली. ज्यानुसार, एक गट वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून दुसरा गट त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वृत्त आहे.  तसेच सचिन वाझे यांच्या राजीनाम्यासाठी आता राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सचिन वाझे गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील आपल्या घरी आले नसल्याचीही माहिती तेथील काही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सचिन वाझे यांनी तिसऱ्यांदा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली.

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्या प्रकरणाचा तपास एनआयए मार्फत केला जात आहे, तसेच मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

कंगाल पाकिस्तानला भारत देणार कोरोना लसीचे इतके कोटी डोस!

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More