बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनचं लोन आता देशातील अनेक राज्यांत पसरलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला आंदोलनांच्या अनेक ठिकाणी भेट द्यावी लागत आहे. मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनीच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यृ झाल्याची माहिती समोर येत आहे.

उत्तर प्रदेश मधील लखमीपूर खारीचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. त्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. आशिष मिश्रा हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या गावी सभा घेण्यासाठी येत होते. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले.

आशिष मिश्रा हे केशव मौर्य यांच्या गावी सभा घेण्यासाठी येत होते तेव्हा शेतकरी तिकोनिया याठिकाणी जमले होते. मात्र त्याअगोदर शेतकरी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीमध्ये काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे आशिष मिश्रा यांनं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यानंतर दोन गाड्या पेटवून दिल्या.

दरम्यान,  कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक देखील दिली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

कंगणा राणावतला ‘या’ मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता?

मोठी बातमी! चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला NCB कडून अटक

शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! ड्रग्ज प्रकरणात आर्यनने केला मोठा खुलासा म्हणाला; मी ड्रग्ज…

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More