बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून महाविकास आघाडी सरकार (MVA) पाडलं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात शिंदे सरकार स्थापन केलं. आता शिवसेनेच्या मूळावर घाव घालण्याचा प्रकार शिंदे गटातर्फे सुरु आहे. त्यांनी शिवसेनेचे संसदेतील कार्यालय आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय शिंदे सरकार बदलत आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून सुरु असलेले महत्वाच्या प्रकरणाचे तपास आता एकनाथ शिंदे यांनी सीबीआयकडे (CBI) देण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेते गिरीष महाजन (Grirish Mahajan)  यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल असलेला खंडणीचा (Extortion) गुन्हा आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा फोन टॅपिंग अहवाल या प्रकरणांशी संबंधित गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचं कळतंय.

राज्य शासनाच्या गृह विभागाकडून हे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीच्या काळातील प्रकरणांचे तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय बदलण्यात किंवा ते कसे चूकीचे होते, हे दाखवण्यात शिंदे सरकार कुठेच कमी पडत नाही.

यापूर्वी शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय नव्याने घेतला. त्यांनी मविआ सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले. त्यामुळे पुढे या नामांतराला कोणतीही तांत्रिक अडचण यायला नको, म्हणून त्यांनी ते निर्णय नव्याने घेतल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More