बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

पुणे | घोळ करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

या घटनेची माहिती होताच नदीशेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी पाण्यात बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले आणि दोघांचाही मृत्यू झाला.

मुलं बुडाल्यामुळे दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम रावबली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी भीमा नदीच्या तिरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होतीही.  दोन्ही मुले एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द येथील दोन सख्ख्या भावंडांचा सेल्फी काढण्याच्या नादात मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

थोडक्यात बातम्या- 

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More