बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढी मोठी फूट पडली आहे. शिवसेनेने शिंदे गटात गेलेल्या 16 बंडखोर आमदारांना हअपात्रतेची नोटीस देखील बजावली. त्याविरोधात शिंदे गटाकडून न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यातच आता शिंदे गटात सामील झालेल्या आणि संपर्कात असलेल्या अनेक आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी यांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरु आहे.

शिवसेनेत हकालपट्टी मोहीम सुरु असून आता पालघर जिल्ह्यातील देखील दोन नेत्यांना शिवसेनेने नारळ दिला. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक (Ravindra Fatak) आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा (Rajesh Shah) यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशावरुन त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना नारळ दिल्याचे वृत्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले.

मंगळवारी रवींद्र फाटक आणि राजेश शहा यांच्यावर ही कारवाई झाली. त्यापूर्वी शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची हिंगोली (Hingoli)  जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांनी काही दिवसांपूर्वी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत ढसाढसा अश्रू गाळले होते. नंतर तेच शिवसेना सोडून शिंदे गटात पळून गेले.

शिवसेना आता स्थानिक पातळीवर नेतृत्व बदल करत आहे. शिंदे गट दिवसेंदिवस फूगत चालल्याने आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. शिवसेना भवनात आता बैठकांचा जोर वाढला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा महिला संघटक म्हणून समिधा मोहिते (Samidha Mohite) यांची तर संपर्क प्रमुख म्हणून अनिता बिर्जे (Anita Birje) यांची निवड झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

आता विमानप्रवास करा फक्त 26 रुपयांत, व्हिएतजेट एअरलाईन्सची खास ऑफर

‘हजारो रुपयांची दाढी कटींग करून पैश्यांच्या जोरावर आलेलं हे सरकार’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही?, नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More