शिवसेेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना!
मुंबई | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत बंड करुन मुख्यमंत्र्यांनाच शह दिला. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. काल फेसबूक लाईव्ह येऊन मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये. त्यात त्यांनी आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असंही म्हटलंय. तसेच बंडखोर आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी प्रतिक्रिया देऊन आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात.
शिवसेनेचे आतापर्यंत 33 आमदार शिंदे गटात सहभागी होते. तर आता सेनेचे आणखी दोन नेते शिंदे यांना मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे. आमदार मंगेश कुडाळकर आणि सरवणकर गुवाहाटीला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सर्व बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. यावर आता काय निर्णय होणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिंदे गटाचे बंडखोर आमदार परत घरी येणार की, भाजपसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन करणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल.
थोडक्यात बातम्या-
‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक
‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट
“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला”
“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”
Comments are closed.