बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

नवी दिल्ली | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती असतानाच आता ऑमीक्रॉन नावाच्या नव्या व्हॅरिअंटने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. ऱशियन देशांनी पुन्हा लॉकडाउन करत निर्बंध कडक केले आहेत. भारतानं देखील त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात आहे. अशातच नायजेरिया देशातून आलेल्या मायलेकीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या या दोघींच्या संपर्कातील अजून एका व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आल्यानं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नायजेरियातून 25 नोव्हेंबर रोजी या दोघी मायलेकी पिंपरी चिंचवड मध्ये आल्या आहेत. आईचे वय 37 वर्षे असून मुलगी 12 वर्षांची आहे. 25 नोव्हेंबर रोजी या दोघींची  नायजेरिया मध्ये कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल  निगेटीव्ह आला होता. मात्र 29 नोव्हेंबरला महापालिकेने केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भारतात राहत असणाऱ्या त्यांच्या मुलाचा देखील अहवाल कोरोनाबाधीत आला आहे. या तीघांमध्ये ओमीक्रॉन व्हॅरिअंट आहे का हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने ‘जिनोम सिकव्हेंसिंग’साठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे रूग्ण चिंचवड भागातील असून त्यांच्यावर जिजामाता रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

जंगलाच्या राजावर झेब्रा पडला भारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड

भाजपच्या बैठकीत तुफान राडा; कार्यकर्त्यांची लाथाबुक्क्यांनी मारहाण

‘…तो शुद्ध हलकटपणा होता’; नितीन राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकर संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More