बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती पुरवणाऱ्या दोन बहिणींना अटक!

भोपाळ | मध्य प्रदेशमधील दोन बहिणींना भारतीय सैन्याची माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघींचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. संबंधित बहिणींपैकी एकीचं नाव कौसर तर दुसरीचं नाव हिना असं आहे.

संबंधित बहिणी या इंदूरच्या गवली पॅलासियामध्ये रहिवासी आहेत. काही दिवसांपुर्वी या दोन्ही बहिणी रस्त्यावर चालत असताना फोनवर बोलत होत्या. याचवेळी सैन्याच्या गुप्त विभागाने त्यांची फ्रिक्वेंसी पकडली. त्यानंतर या दोघींवरही कडक नजर ठेवण्यात आली. चार दिवसांपुर्वी इंटेलिजेन्स ब्यूरो एटीएस आणि स्थानिक सैन्य गुप्तचर विभागाच्या टीमनं या दोघींच्या घरावर छापा टाकला. यादरम्यान संबंधित बहिणींच्या घरी सतत वाहने येत असल्याने लोकांना संशय आला.

हा संपुर्ण प्रकार समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय इन्वेस्टीगेशन एजन्सी त्यांची चैकशी करत आहेत. या दोघींकडचे फोन आणि लॅपटाॅप देखील जप्त करण्यात आले आहे. या दोघींना माॅरिशयसमधून फंडिंग करण्यात येत होतं. विशेष बाब म्हणजे या दोघींचे वडील देखील सैन्यात काम करत होते. त्यानंतर त्यांनी इंदूरमधील एसबीआयच्या शाखेत सुरक्षारक्षक म्हणून देखील काम केलं आहे.

दरम्यान, संबंधित बहिणींच्या वडीलांचं निधन झालं आहे. तसेच या दोघी बहिणी काही काळापुर्वी नोकरी करत होत्या. मात्र तेथून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘2 महिन्याच्या बाळाला आईचं दूध हवंय’; भूमी पेडणेकरने केली ब्रेस्ट मिल्कची मागणी

स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

“नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस सत्तेत असती तर…”

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप

फेरे घेतल्यानंतर मंडपातून नवरी फरार, कारण ऐकून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकरली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More