बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

कल्याण | कल्याणच्या कोळसेवाडी भागात धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरुण आणि एका तरुणीला जमावानं बेदम मारहाण केली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित तरुणी रात्री रिक्षानं प्रवास करत होती. यावेळी रिक्षआचालकानं तिला छेडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

संबंधित तरुणीनं फोन करुन आपल्या मित्रांना बोलावलं. हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आणि गावकऱ्यांनी तरुणी आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असं मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत.

सध्या या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कल्याण पश्चिमेकडील कोळसेवाडी पारिसरात काटेमानीवली नाक्यावर भररस्त्यात हा प्रकार घडला. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला आहे की नाही, याची काहीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अतिशय संतापजनक घटना आहे ही. जर आपण पाहिलं तर याप्रकरणात मुलीची छेड रिक्षाचालकाकडून काढण्यात आली आणि तिनं ज्यांना मदतीसाठी बोलावलं, त्या मुलांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये पोलिसांची कारवाई पाहिली तर, ज्यांनी मारलं ते अद्याप मोकाटच आहे, पण जे वाचवायला आले, त्यांना मात्र पोलीस स्थानकात बसवून ठेवलं आहे. असा अजब कारभार पोलीस दलाचा पाहायला मिळतोय, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; आचार्य तुषार भोसले भडकले

अनिल देशमुखांचा अचानक दिल्ली दौरा; ईडीची पिडा संपवण्यासाठी नवा मार्ग शोधणार?

काही गैरसमज झाले पण यापुढे असं होणार नाही- अजित पवार

बंडातात्या कराडकर पायी वारीवर ठाम; सरकारचा आदेश झुगारल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्र सरकारविरोधात बाॅलिवूडचे कलाकार एकवटले, नव्या सिनेमॅटोग्राफ विधेयकाला जोरदार विरोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More