बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | माइक टायसन (Mike Tyson) हे नाव बाॅक्सिंगच्या जगतातील महान नाव आहे. रिंगमध्ये असताना प्रतिस्पर्धा स्पर्धकाला आपल्या तडाखेबंद हल्ल्यानं घायाळ करणारा टायसन आता वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. चाहत्यानं मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल केला आहे.

टायसनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चाहत्यांना देखील हैराण केलं आहे. माइकसोबत मागच्या सीटवर विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशामुळं हा सर्व गोंधळ घडला आहे. वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला माइकनं मारहाण केली.

माइक टायसन फ्लोरिडाच्या विमानानं प्रवास करत होता. प्रवास चालू असताना मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडून माइकला त्रास झाला. त्या प्रवाशाने माइकला त्रास देतानाचा व्हिडीओ बनवण्यास त्याच्या मित्राला सांगितलं. माइकला हे सहन झाले नाही अन् त्यानं उठून त्या प्रवाशाला ठोसे लगावले. त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर ठोसे बसल्यानं रक्त येताना दिसत आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, माइक टायसन हा रिंग बाहेर कधी अशा वाईट कारणांनी चर्चेत नसतो. पण सहप्रवासी माणूस चांगला नसेल तर असा प्रकार घडू शकतो. विमानातील इतर प्रवाशांनी माइकला शांत केल्यानं पुढील प्रसंग टळला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“मी भ्रष्टाचार केला असेल तर फक्त…”, मंत्री हसन मुश्रीफांचं खुलं आव्हान

“छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग”

“…जरा तारतम्य ठेऊन बोलावं”, अजित पवारांनी मिटकरींना फटकारलं

मोठी बातमी! राणा दांपत्याला मुंबई पोलिसांचा झटका

“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More