Top News महाराष्ट्र

सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र- उदयनराजे भोसले

सातारा | सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले असल्याची टीका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यातील पदवीधर मतदरसंघाची पाहणी करण्यासाठी मतदान केंद्रावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

तिन्ही पक्षांचा केवळ सत्त्ता हस्तगत करणं हाच एकत्र येण्यामागचा हेतू होता.  ज्यावेळी अशा वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना अमिष दाखवलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या उद्देश सार्थक झाला की ति निघुन जातील, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

या सर्व गोष्टींना मात्र भाजप अपवाद असून भाजप विचाराने एकत्र असून त्यांना कोणत्याच ताकतीचा उपयोग करावा लागत नाही त्यामुळेच ते एकसंघ असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

दरम्यान, भाजपमधील एकोपा आणि टीमवर्क आहे त्याचं फळ निश्चितच दिसून येईल. राज्यातील सहाच्या सहा जागांवर भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

“अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार”

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

‘मी काय मूर्ख आहे का?’, मतदान केंद्रावर ‘या’ कारणामुळं बिचुकलेंचा संताप

“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”

“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या