मुंबई | पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री, असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला होता. यावरून सामंत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री, शिवसेनेला प्रतिकार कसा करावा हे सांगावं लागत नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी शेलारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असं स्पष्टीकरण शेलारांनी दिलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“…तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही”
“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं”
महत्वाच्या बातम्या-
माझ्या भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो- आशिष शेलार
दिल्लीत प्रचाराला गेलेल्या चंद्रकांत पाटलांची केजरीवालांवर सडकून टीका
शेलारांनी शब्द जरा जपून वापरावेत; सुप्रिया सुळेंचा सल्ला
Comments are closed.