Uday Samant | महायुतीचा शपथविधी सोहळा होण्यासाठी काही तास शिल्लक असताना शिंदे गटात मोठा हायव्होल्टेज ड्रामा दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे अजूनही ठाम असल्याची चर्चा आहे. त्यातच शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने केलेल्या वक्तव्याने याबद्दल अजूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Uday Samant)
गृहमंत्रीपदाबाबत अजूनही तोडगा न निघल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर, आझाद मैदान येथे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नावच छापलेलं नाही. यामुळे देखील वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही. हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे. त्यांना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. (Uday Samant)
उदय सामंत यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत अजूनही काही गोष्टींबाबत वाद सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यातच शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असावी, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
“प्रत्येक पक्षाने आपापल्या…”
यावेळी उदय सामंत यांनी निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याबाबत देखील माहिती दिली. “प्रत्येक पक्षाने आपापल्या निमंत्रण पत्रिका छापून त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्याव्यात. त्याची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी, असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जी पत्रिका छापली, त्यात अजित पवार यांचे नाव टाकलेले आहे. तर शिवसेनेने शासनाच्या निमंत्रण पत्रिकेचा फॉरमॅट घेतला आहे. त्यामुळे यात काही ठरवून झाले आहे, असे आम्हाला वाटत नाही.”, असं उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.
News Title – Uday Samant Big Statement on Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या-
शपथविधीआधी वर्षावर हायव्होल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!
अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न यंदाही अपूर्णच, मात्र केला ‘हा’ नवा रेकॉर्ड!
एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?; ‘या’ बड्या नेत्याने सस्पेन्स संपवला