महाराष्ट्र मुंबई

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

मुंबई | विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना झाल्यानंतरच या परीक्षांवर निर्णय घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. तसेच विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे. आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे, असंही सामंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ऑनलाईन अध्यापन सध्या सुरु आहे. ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल, असं सामंत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या