बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

सांगली | तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 252 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवलं. पण राज्य सरकारने मदत जाहीर केल्यानंतर 15 दिवसांनी केंद्र सरकारची कमिटी आली पण त्यांनी फक्त जेवणावर ताव मारला आणि ते नेमके नदीतले मासे खायला आले की, समुद्रातले हे मला माहीत नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार नसल्यामुळे कोकणात नुकसान पाहणी दौर्‍यासाठी आले नसावेत, असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. त्याबरोबरच गुजरातला मात्र पंतप्रधानांनी 1 हजार कोटींची मदत केली. त्यापैकी 500 कोटी जरी महाराष्ट्राच्या वाट्याला आले असते तर आम्ही धन्य झालो असतो, अशा शब्दात उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारचे नुकसानीच्या मदतीचे निकष वेगळे आहेत. घराचं संपूर्ण नुकसान झालं असल्यास 95 हजार पूर्वी दिले जायचे त्याबरोबरच पडझड झाली असल्यास 6 हजार रुपये मदत केली जायची. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष सरकारी आदेश काढून मदतीमध्ये अडीच पट वाढ करून कोकणाला दिलासा दिला असून मागच्यावेळी संपूर्ण किनारपट्टीला 350 कोटींच्यावर मदत केली आहे. तसेच आता नुकसानी दरम्यान 252 कोटींची मदत जाहीर केली आहे, असं स्पष्ट केलं आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीत कोकणवासीयांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर केली. पण केंद्राच्या मदतीवरून आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More