बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | शिवसेनेने पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक शहरात शिवसेेनेने जोरदार तयारी चालू केली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात हा शिवसंपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभिनयाचा शुभारंभ पुण्यातून शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. मंगळवारी सातारा शहरात या उपक्रमाची सांगता करण्यात आली. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे देशभरातून कौतुक झाले. त्यामुळे विरोधकांमध्ये पोटशूळ उठला आणि आमच्या पक्ष नेतृत्वाला थांबवण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या मार्गाने षडयंत्र रचू लागले. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला सारखं सारखं डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही त्यांचे बारा वाजवू, असा इशारा उदय सामंत यांनी विरोधकांना दिला आहे.

विरोधकांकडून अनेक षडयंत्र रचले जात आहेत. त्यांचे हे षडयंत्र आपल्याला शिवसंपर्क अभियानातून हाणून पडायचे आहेत. यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने ग्रामीण भागात शिवसंपर्क अभियान वाढवावं, असे आदेश उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक पक्षातील नेतृत्वांकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं होतं. जनतेची काम करा आणि पक्ष बळकट करा, असा नारा त्यांनी दिला होता. कोरोना मुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवावी असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

थोडक्यात बातम्या-

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More