उदय सामंतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “एकनाथ शिंदेंचं पत्र घेऊन आम्ही…”

Uday Samant | महाराष्ट्राला आज नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अनेक दिग्गज नेते यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

शपथविधीला काहीच वेळ बाकी असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. ठरल्या प्रमाणे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. काही तास बाकी असताना शिंदेंचा ड्रामा पहायला मिळाला.

काय आहे प्रकार?

गृहमंत्रीपदाबाबत अजूनही तोडगा न निघल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता शिंदे गटाचे उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांशी बोलत असताना उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचं ठरलं आहे, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सामंत म्हणाले की, शिंदेंचा निरोप घेऊन ते फडणवीस यांच्याकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे पत्र तयार झाले आहे. हे पत्र घेऊन आम्ही राजभवनाकडे निघालो.

“तर आम्ही ते स्वीकारणार नाही”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याचं उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नेते, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता या आकडेवारीनुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह 33 जणांचा समावेश असणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

News Title : uday samant on eknath shinde

महत्त्वाच्या बातम्या-

राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…

अजितदादांच्या राष्ट्रवादीने किती मंत्रीपदं मागितली? बड्या नेत्यानी संख्याच सांगितली

“एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल, तर…”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

हवामान विभागाने सावध राहण्याचं केलं आवाहन! यामागचं कारण काय?

शपथविधीआधी वर्षावर हायव्होल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?