“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी 45 खासदार निवडून येतील तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा विश्वास मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला आहे.

केजरीवाल यांच्या भेटीचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या भेटीचं विश्लेषण करताना मंत्री उदय सामंत यांनी मात्र या भेटीगाठीचा कोणताही फरक राज्याच्या राजकारणावर होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

भेटीगाठी झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या मताला किंमत शून्य असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे.

ठाकरे गटाला आता कुणाची ना कुणाच्या आधाराची गरज आहे, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं म्हटलं आहे. ज

दरम्यान, कसाब पोटनिवडणुकीवरही सामंत यांनी भाष्य केलं आहे. पैसे वाटप झाल्याच्या आरोपाबद्दल बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्याकडून हा आरोप केला जात असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-