बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली पण…’ निलेश राणे यांच्या आरोपावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण

मुंबई | कोकण दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही भेट नेमकी कशासाठी झाली होती, याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर आता उदय सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ज्यांना लोकांनी 2 वेळा नाकारलं त्यांची दखल का घ्यावी. मी आजपर्यंत कधीही त्यांच्या आरोपांची दखल घेतलेली नाही आणि इथून पुढेही घेणार नाही. ज्यांनी कोणी आरोप केला आहे, 6 दिवसापूर्वी ही घटना झाली आहे. रत्नागिरीच्या विश्रामगृहात आम्ही होतो. तेव्हा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आले. माझ्या मतदारसंघात आल्यानं मी त्यांचं स्वागत केलं. तेव्हा मी एकटा दुपटा भेटलो नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर देखील त्याठिकाणी होते, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

बैठक बंद खोलीत झाली नाही. सर्व पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

दरम्यान, आरोप कोण करतंय ते पाहणं गरजेचं आहे, दखल घेण्यास व्यक्ती पात्र आहे का ? असा पलटवार उदय सावंत यांनी केला आहे.  त्याचबरोबर नाव न घेता निलेश राणे यांना फडणवीस यांनी नैतिकता शिकवावी, असं देखील उदय सावंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलगी झाली म्हणून विवाहितेसोबत तिच्याच कुटुंबियांनी केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More